पुणे

पुणे : पावणेदोन लाखांचे मंगळसूत्र चोरीला

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बंडगार्डन येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळील बसस्थांब्यावरून बसमध्ये चढत असताना बुधवारी एका महिलेच्या पर्समधील एक लाख 80 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरी केले. याप्रकरणी माहुली सातारा येथील 52 वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला बसमध्ये चढत होत्या. त्या वेळी चोरट्यांनी त्यांचे लक्ष चुकवून त्यांच्या पर्सची चैन खोलून मंगळसूत्र चोरी केले.

सोनसाखळी लांबवली
कपड्याच्या दुकानात खरेदीसाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील 75 हजार रुपये किमतीची सोनसाळी चोरट्याने लांबविली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका 31 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT