पुणे

धामणी दरोड्यातील चौथा आरोपी गजाआड

अमृता चौगुले

मंचर ; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील धामणी येथे फेब्रुवारीमध्ये पडलेल्या दरोड्यातील चौथ्या आरोपीला पारगाव पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 19) दरेवाडी (ता. संगमनेर) येथे करण्यात आली, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली. रवींद्र भाऊसाहेब फड (वय 31, रा. दरेवाडी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धामणी येथे दि. 16 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दरोडेखोरांनी एका ज्येष्ठ दाम्पत्याच्या घरी दरोडा टाकला होता. दाम्पत्याचे हातपाय बांधून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच घरातील 1 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी पारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.

याप्रकरणी पोलिसांनी वैभव दिगंबर नागरे (वय 19), नंदकुमार शंकर पवार (वय 21) व आकाश पांडुरंग फड (वय 26, रा. दरेवाडी) या तीन आरोपींना अटक केली होती. गुन्ह्यातील चौथा आरोपी रवींद्र फड हा पोलिसांना चकवा देत होता. गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे रविवारी (दि. 19) फडला दरेवाडी येथून अटक केली. पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT