पिंपरी : लग्नाच्या आमिषाने एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना मे 2020 ते 5 जून 2022 या कालावधीत खडकी येथे घडली. गौरव काकासाहेब साबळे (25, रा. खडकी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी पीडितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादी सोबत मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने मुलीला घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.