पुणे : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार बुडाला आहे. त्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीने स. प. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली.
वेदांत फॉक्सकॉनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली असून, त्यादरम्यान मोदी यांनी 'फॉक्सकॉन'पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
यावर 'माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की, त्यांनी अजितदादांना मुख्यमंत्री करावे. आम्ही त्यांना यापेक्षा मोठे पद देऊ,' असा टोला खा. सुळे यांनी शिंदे यांना लगावला. आंदोलनात प्रवक्ते प्रदीप देशमुख, मृणालिनी वाणी आदी सहभागी झाले होते.