तळेगाव स्टेशन, पुढारी वृत्तसेवा: खाजगीकरणाच्या विरोधात बुधवार रात्री १२ वाजल्यापासून वीज कर्मचारी,अधिकारी, अभियंता संघर्ष कृती समितीच्या वतीने राज्यातील वीज महानिर्मिती, महापारेषण, महावितरणमधील वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्यात आलेला आहे. यामध्ये वीज कामगार,अधिकारी अभियंते संपावर जाणार आहेत. या संपामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. या संपात तळेगाव दाभाडे, वडगाव, लोणावळा या उपविभागामधील वीज महानिर्मिती, महापारेषण, महावितरण मधील एकूण २२५ ते २५० कर्मचारी,अभियंते, अधिकारी संपात उतरण्याची शक्यता आहे.