'महारेरा' नोंदणीत पुण्याचा पहिला क्रमांक; पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 12,788 प्रकल्पांची नोंद File Photo
पुणे

MahaRERA Action: फसव्या ‘ओसी’वर महारेराची नजर! बिल्डरांची धडधड वाढली

बोगस ‘ओसी’ सादर करून खरेदीदारांची फसवणूक करणार्‍या प्रकरणांना आळा घालण्यात येणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Builders under MahaRERA watch

दिगंबर दराडे

पुणे: ‘महारेरा’कडून बांधकाम प्रकल्पांच्या ऑक्युपन्सी सर्टिफिकेट्सची मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू करण्यात आली आहे. बोगस ‘ओसी’ सादर करून खरेदीदारांची फसवणूक करणार्‍या प्रकरणांना आळा घालण्यात येणार आहे.

बड्या बिल्डरांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी ‘महारेरा’ पुढे सरसावले आहे. अनेक बिल्डरांकडून सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक करण्यात येत आहे. ग्राहकांनी कमविलेल्या पुंजीवर डल्ला मारण्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत. (Latest Pune News)

त्याला आळा घालण्यासाठी ही मोहीम ‘महारेरा’ने हाती घेतली आहे. सध्या 2,600 सुरू असलेल्या प्रकल्पांचे आणि 3,699 कालबाह्य प्रकल्पांची प्रमाणपत्रे संबंधित नगररचना प्राधिकरणांकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आलेली आहेत. बोगसगिरी करणार्‍या बिल्डरांची नावे यामुळे उघडकीस येणार आहेत.

काही ठिकाणी बनावट ओसी दाखवून अनधिकृत बांधकामे करण्यात आल्याची माहिती ‘महारेरा’डे उपलब्ध झालेली आहे. बिल्डरांची माहिती संबंधित विभागाला पाठवून ओसीची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

संबंधित प्राधिकरणाने लवकरात लवकर ही माहिती ‘महारेरा’ला त्याची पडताळणी करून रिपोर्ट द्यायचा आहे. जर त्यांनी काही उत्तर दिलं नाही, तर तो तात्पुरत्या स्वरूपात ग्राह्य धरला जातो. उशिरा दिलेल्या माहितीला ते सबंधित प्राधिकरण जबाबदार राहणार आहे. अनेक प्रकल्पांमध्ये, सुरुवातीचे दस्तऐवज (प्लॅन) असले तरी ते ‘महारेरा’च्या साईडवर अपलोड केले जात नाहीत, ज्यामुळे खरेदीदाराची फसवणूक होऊ शकते. ममहारेराफच्या या निर्णयामुळे ग्राहक, विकसक व प्रशासनासाठी पारदर्शकता येणार आहे.

जर ’ओसी’मध्ये अडचण नसल्यास घर खरेदी करताना विश्वास वाढेल. जर चुकीची माहिती बिल्डरांनी भरली तर ओसीची पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय निधी काढता येणार नाही.

महत्त्वाचे मुद्दे

बोगस ‘ओसी’विरोधात कारवाई : महारेराकडून बोगस ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (ओसी) दाखवून खरेदीदारांची फसवणूक करणार्‍या बिल्डरांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू

2. 6,000 हून अधिक प्रकल्पांची तपासणी : 2,600 सुरू असलेल्या व 3,699 कालबाह्य प्रकल्पांची ओसी प्रमाणपत्रे नगररचना प्राधिकरणांकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आली.

अनधिकृत बांधकामांचा पर्दाफाश : काही ठिकाणी बनावट ओसी दाखवून अनधिकृत बांधकाम झाल्याचे उघड; संबंधित विभागांना तपासणीचे आदेश.

अपारदर्शक व्यवहारांवर मर्यादा : बरेच बिल्डर सुरुवातीचे मंजूर प्लॅन ममहारेराफच्या वेबसाइटवर अपलोड करत नाहीत, ज्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते.

पारदर्शकतेचा निर्णय : ओसी पडताळणी पूर्ण न झाल्यास निधी मिळणार नाही; यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढणार आणि व्यवस्थेत पारदर्शकता येणार

प्रामुख्याने क्रेडाई सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करते, अन्यदेखील बांधकाम व्यावसायिकांनी ‘महारेरा’च्या नियमांचे कडक पद्धतीने पालन करणे आवश्यक आहे. जेणेकरून ग्राहक आणि विकसक यांच्यात पारदर्शकता निर्माण होईल. विकसकांवरच विश्वास आणखी दृढ होईल. काही चुकीच्या लोकांमुळे हे क्षेत्र बदनाम होते. नियम जर पाळले गेले तर चुकीच्या बाबींना निश्चितपणे आळा बसेल.
- मनीष जैन, क्रेडाई, अध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT