तृतीयपंथीयांना ओळखपत्र देण्यात महाराष्ट्र अव्वल File Photo
पुणे

Transgender ID Cards: तृतीयपंथीयांना ओळखपत्र देण्यात महाराष्ट्र अव्वल

आतापर्यंत राज्यातून 4,411 ओळखपत्रे दिली आहेत.

शिवाजी शिंदे

Maharashtra transgender identity card

शिवाजी शिंदे

पुणे: तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत देशात महाराष्ट्र राज्य प्रथम ठरले आहे. आतापर्यंत राज्यातून 4,411 ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर कर्नाटक 3528, आंध्र प्रदेश 2905, ओडिशा 2668 या राज्यांचा समावेश आहे.

केंद्राच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज नोंदणी व तपासणीनंतर ओळखपत्रे देण्यात येतात. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम 2019 मधील नियम 2020 अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे. (Latest Pune News)

त्यानुसार जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीयांनी ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या पोर्टलला भेट देऊन ‘अप्लाय ऑनलाईन’ यावर आपला युजर आयडी आणि पासवर्ड तयार करून आपली सर्व माहिती भरावी. ऑनलाईन अर्जासोबत मानसोपचारतज्ज्ञांनी दिलेला अहवाल व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.

समाजकल्याण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने ओळखपत्र काढण्यासाठी जनजागृती होत असल्यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक अर्ज प्राप्त होऊन ओळखपत्रे देण्यात आली आहेत. ओळखपत्रे मिळाल्यामुळे या नागरिकांना स्वत:च्या पायावर उभे राहता येणार असून, ते समाजात आर्थिकद़ृष्ट्या सक्षम होऊ शकणार आहेत.
- स्वाती इथापे, समाजकल्याण उपायुक्त, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT