महाराष्ट्र स्वराज्य पक्ष भाजपची बी टीम नाही file photo
पुणे

महाराष्ट्र स्वराज्य पक्ष भाजपची बी टीम नाही

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील काही नेतेमंडळी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हा भाजपची बी टीम आहे, असा प्रचार करत आहेत. तसे काही मॅसेजेस पण मला आले. पण, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हा भाजपची बी टीम नाही, अशी स्पष्टोक्ती माजी खासदार संभाजीराजे यांनी मेळाव्यामध्ये दिली. त्याचप्रमाणे येत्या निवडणुकीत समविचारींना अन् विस्थापितांना सोबत घेऊन प्रस्थापितांना धडा शिकवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या स्थापना दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव,उपाध्यक्ष अंकुश जाधव, रघुनाथ चित्रे पाटील, महादेव तळेकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत मी वडिलांचा म्हणजेच काँग्रेसचा प्रचार केला तेव्हा भाजपची बी टीम का म्हणाले नाही. थेट पंतप्रधान यांना मी शिवस्मारकाबाबत जाहीर प्रश्न केला. राज्यात सहकार मोडीत काढण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका ही त्यांनी या वेळी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT