सातबारा, 8 अ उतारा, दाखले आता व्हॉटस्‌‍ॲपवर  
पुणे

Digital Satbara : सातबारा, 8 अ उतारा, दाखले आता व्हॉटस्‌‍ॲपवर

राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाचा अभिनव उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

शिवाजी शिंदे

पुणे : राज्यातील नागरिकांना सातबारा, 8 अ उतारे आता व्हॉटस्‌‍ॲपच्या माध्यमातून मिळणार आहेत. ही सुविधा महाभूमी संकेतस्थळावरून थेट मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. यासाठी नागरिक तसेच शेतकऱ्यांना माफक शुल्कात नोंदणी करता येणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्या या नावीन्यपूर्ण अभिनव उपक्रमाचा राज्यातील शेतकरी तसेच नागरिक यांना लाभ होणार आहे. ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येऊन त्यानंतर राज्यात टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे.

राज्यात मागील काही वर्षांपासून सातबारा उताऱ्यासह आवश्यक असलेले उतारे ऑनलाईन मिळत आहेत. केवळ 15 रुपये शुल्क भरून ही सुविधा सुरू शासनाने सुरू केली आहे. मात्र हे दाखले काढण्यासाठी शेतकऱ्यांना सेतू किंवा महा ई-सेवा केंद्रावर जाऊन काढावे लागतात. त्यासाठी कधी कधी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्काव्यतिरिक्त जादा रक्कम मोजावी लागते. त्यातही उतारा किंवा दाखला संबंधिताच्या संगणकावर डाऊनलोड होतो. त्यानंतर पेनड्राईव्हमधून तो शेतकऱ्याला घ्यावा लागतो. त्यातही या उताऱ्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन भूमी अभिलेख विभागाने ही सुविधा व्हॉटस्‌‍ॲपवरून देण्याचे ठरविले आहे. यासाठी महाभूमी संकेतस्थळावर मोबाईल क्रमांक टाकल्यास केवळ 15 रुपयांत सातबारा आणि 8 अ उतारा थेट व्हॉटस्‌‍ॲप क्रमांकावर मिळणार आहे. उताऱ्याची सुरक्षितता कायम राहीलच; शिवाय त्याचा गैरवापरही थांबणार आहे. सातबारा उताऱ्याबरोबरच मिळकत पत्रिका, ई-रेकॉर्डमधील दाखलेही व्हॉटस्‌‍ॲपवर मिळणार आहेत.

...या असणार सुविधा

सातबारा उतारा, 8 अ उतारा, फेरफारांची नोंद, ई-रेकॉर्डमधील माहिती हे दाखलेसुद्धा नागरिक व्हॉटस्‌‍ॲपवरून थेट डिजिटल स्वरूपात डाऊनलोड करता येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT