Growth Pudhari
पुणे

Maharashtra Revenue Growth: महसूलवाढीत महाराष्ट्र देशात अव्वल; जीएसटीमध्ये 45% वाढ

डिजिटलायझेशन आणि प्रभावी कर प्रशासनामुळे 35% महसूलवाढ; रिझर्व्ह बँकेच्या अहवालात राज्याच्या प्रगतीचे कौतुक

पुढारी वृत्तसेवा

आशिष देशमुख

पुणे: महाराष्ट्राने महसूलवाढीत यंदा देशात विक्रम केला आहे. जीएसटी, मुद्रांक, नोंदणी शुल्क, प्राप्तिकर संकलनासह एकूण महसुलात गत चार वर्षांत तब्बल 35 टक्के वाढ नोंदली गेली. जीएसटी संकलनात तब्बल 45 टक्के वाढ झाल्याने महाराष्ट्राने देशात अव्वलस्थान पटकावले आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश दुसऱ्या स्थानी आहे. डिजिटलाझेशन, मायक्रो प्लॅनिंग केल्यामुळे ही वाढ झाली आहे.

महाराष्ट्र हे उच्च करक्षमतेचे राज्य असून, गत चार वर्षांत डिजिटलायझेशनमुळे एकूण महसुलात तब्बल 35 टक्के वाढ झाली आहे. तसेच करेतर महसुलातही (फी आणि खाणीची रॉयल्टी) वाढ झाली आहे. जीएसटी हा सर्वात मोठा उत्पन्न स्रोत असून, त्यात 45 टक्के वाढ झाली आहे. ही वाढ केवळ आर्थिक नसून, डिजिटलायझेशन, प्रभावी कर प्रशासन आणि धोरणात्मक नियोजन यांचा संयुक्त परिणाम आहे. ही बाब राज्याच्या वित्तीय स्थैर्यास बळकटी देणारी आहे, असा शेरा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेल्या ताज्या अहवालात नोंदवला आहे. देशातील सर्वच राज्यांचा वित्तीय अहवाल आरबीआयने जाहीर केला आहे. त्यातील हे महत्तवाचे निष्कर्ष आहेत.

काय आहेत कारणे?

  • विभागनिहाय महसूल ट्रॅकिंग

  • उच्च जोखमीच्या क्षेत्रांवर लक्ष

  • आर्थिक पुनरुत्थान (पोस्ट कोविड )

  • उद्योग, सेवा क्षेत्रात वाढ

  • रिअल इस्टेट व्यवहारात वाढ

  • घरखरेदीत वाढ

  • मुद्रांक व नोंदणी महसुलात वाढ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT