पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आता मात्र गेल्या काही दिवसांपासून थांबला आहे. केवळ काही भागात हलकासा पाऊस पडत आहे. मात्र, त्याचा जोर अत्यंत कमी आहे.
राज्यात मे, जून महिन्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यानंतर हळूहळू पाऊस कमी होत गेला. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील विदर्भ, घाटमाथ्यावर पावसाचा जोर खूप होता. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, काही भागांत हलका पाऊस पडत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात काही भागांत किरकोळ पाऊस पडेल. (Latest Pune News)