पुणे: राज्यातील पावसाची तीव्रता कमी झाली आहे. मात्र, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील काही दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस पाऊस कमी राहण्याचे संकेत आहेत. राज्यातील रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, रायगड, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत शनिवारी तसेच रविवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. (Latest Pune News)
या आठवड्यात पाऊस कमीच
हवामान विभागाने पुढील दोन आठवड्यांचा हवामान अंदाज दिला असून 28 ऑगस्टपर्यंतच्या आठवड्यापर्यंत कोकणातील तुरळक भाग वगळता राज्यात पाऊस कमी राहणार आहे. 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरच्या कालावधीत कोकण तसेच विदर्भात पाऊस अधिक राहणार आहे. इतरत्र पाऊस कमी राहील.