पुणे : राज्यात पावसाचा मुक्काम सोमवार (दि. २७) पर्यंत वाढला आहे. कोकणात मुसळधार, तर उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल. बुधवारी (दि. २२) पुणे घाटमाथ्याला अतिमुसळधारेचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
राज्यात कोकणसह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू असून २७ जुलैपर्यंत पावसाचा मुक्काम वाढला आहे. उर्वरित भागात भीज पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांची चिंता किंचित कमी झाली आहे. कोकणात २७ पर्यंत मुसळधार, तर उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, बुधवारी (दि. २२) पुणे घाटमाथ्याला अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात मुसळधार पावासाचा अंदाज आहे.
कोकण : (दि. २२ ते २७ जुलै) : ऑरेंज अलर्ट (मुसळधार)
- मध्य महाराष्ट्र : २२ जुलै : रेड अलर्ट (अतिमुसळधार)
(२३ ते २७ जुलै मध्यम पाऊस)
- विदर्भ : २३ ते २७ : यलो अलर्ट (मध्यम ते मुसळधार)
- मराठवाडा : २३ ते २७ : हलका ते मध्यम
कोकण : मंडणगड १७०, माथेरान ११५, पनवेल ११०, लांजा १०७, वाडा १०६, चिपळूण १०५, ठाणे १०१, खेड ९८, संगमेश्वर (देवरूख) ९४, सांताक्रूझ ८८, गुहागर ८७, भिवंडी ८१, श्रीवर्धन ८०, राजापूर ७७, वाकवली ७५, सुधागड (पाली) ६९, दापोली ६८, पोलादपूर ६७, विक्रमगड ६५, उल्हासनगर ६४.
मध्य महाराष्ट्र : राधानगरी १२४, महाबळेश्वर १०८, गगनबावडा ८७, गारगोटी ३७, लोणावळा ३७, आजरा, पन्हाळा ३५ प्रत्येकी, कोल्हापूर ३०.
मराठवाडा : माहूर ३०, वाशी १२, कन्नड, हिमायतनगर ९ प्रत्येकी, औसा ०८.
विदर्भ : साकोली ४८, भामरागड, तुमसर ३१, भंडारा २८, सडक, कळमेश्वर, अमरावती, रिसोड २१, पांढरकवडा, लाखनी २०, घाटंजी १९, लाखादंरू १८, मोशी, देसाईगंज, एटापल्ली १६, सावनेर १५, नरखेड १३, सिरोंचा ११.
घाटमाथा : कोयना १७१, भिरा १५०, डोंगरवाडी, १०७, ताम्हिणी १०२, दावडी ८८, शिरगाव ८०, अंबोणे ६५, लोणावळा ४०, धारावी ३६, वळवण ३४, खोपोली, खंद २७, लोणावळा २३.