Maharashtra Rain Update Pudhari
पुणे

Maharashtra Rain Update : धक्कादायक..! जुलैमध्ये राज्यात कमी पाऊस, अल-निनो कमी होताच सप्टेंबरमध्ये पाऊस वाढणार

सरासरीच्या ९० ते ९४ टक्केच पाऊस; मध्य महाराष्ट्र-मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी, विदर्भ सरासरी गाठण्याची शक्यता : २ ते ५ जुलैदरम्यान कोकणात अतिवृष्टी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : अल-निनोच्या प्रभावामुळे जूनपाठोपाठ जुलैमध्येही देशात आणि महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी (९० ते ९४ टक्के ) पाऊस होईल. प्रामुख्याने विदर्भात सरासरीपेक्षा जास्त, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमी पाऊस पडेल, असा अंदाज मंगळवारी दिल्ली येथील भारतीय हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिला.

डॉ. महापात्रा यांनी सांगितले, की जून ते ऑगस्ट या कालवधीत देशात सर्वत्र सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील. कारण अल -निनोचा प्रभाव आहे. ऑगस्टअखेर आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला अल-निनोचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाऊस जास्त होऊ शकतो. मात्र, जुलैमध्ये सरासरीपेक्षा ९० ते ९४ टक्के पाऊस होईल. जुलैमध्ये सरासरी २८० मि.मी.पाऊस पडतो. मात्र, याच्या ९० ते ९४ टक्के इतका कमी पाऊस होईल, तसेच किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. देशाच्या बहुतांश भागांतील तापमान हे सरासरीपेक्षा जास्त राहील.

डॉ. महापात्रा उवाच...

  • महाराष्ट्रात संपूर्ण जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील. यात मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागाचा समावेश आहे.

  • महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये १ ते १० जुलैदरम्यान चांगला पाऊस राहील.

  • विदर्भात मात्र जुलैत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

  • २ ते ५ जुलैदरम्यान महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल. कोकणला चार दिवस रेड अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागांत हे चार दिवस मध्यम ते मुसळधार राहील.

  • २ ते ५ जुलैदरम्यान कोकणात रेड, तर उर्वरित भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT