पुणे: राज्यातील पाऊस गुरुवारपासून कमी झाला असून शुक्रवारपासून बहुतांश भागातून पाऊस कमी होऊन तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सप्टेंबर महिना उजाडताच राज्यातील काही भागांत हलका पाऊस सुरू झाला होता. बुधवारपर्यंत पाऊस वाढीचे अलर्ट होते.
मात्र, गुरुवारी हवेचे दाब अचानक वाढल्याने हे अलर्ट क्षीण झाले. त्यामुळे राज्यातून पाऊस कमी झाला. परिणामी आगामी काही दिवस राज्यातील तापमानात वाढ होईल. तुरळक भागातच रिमझिम पावसाचा अंदाज आहे.