File Photo
पुणे

Maharashtra Rain Alert : राज्याला शनिवारपर्यंत पावसाचे अलर्ट; वातावरणात बदल

पुढारी वृत्तसेवा

पुणे : देशातील सुमारे 60 टक्के भागावर पाऊस आणि गारपीट सुरू झाल्याने वातावरण थंड होत आहे. पारा 44 करून 38 ते 40 अंशांपर्यंत खाली आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात फक्त कोकण, विदर्भात उष्णतेची लाट सक्रिय असून, उर्वरित भागाचे तापमान किंचित घटले आहे. दरम्यान, विदर्भवगळता संपूर्ण राज्यात 8 ते 9 मेपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात पुन्हा एकदा वातावरणात बदल झालेला आहे. सरासरी कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी घट झाली आहे. बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 8 ते 9 मेपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्याचे तापमान

वर्धा 43.5, अमरावती 42.8, बुलडाणा 37.7, ब्रह्मपुरी 42.2, चंद्रपूर 42, गोंदिया 38, नागपूर 40.4, अकोला 42.5, मुंबई 34.8, अलिबाग 37.5, रत्नागिरी 34.5, पुणे 37.2, अहिल्यानगर 39.4, कोल्हापूर 36.9, महाबळेश्वर 30.9.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT