बारामती: गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, दरम्यान याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना दोन्ही पवार कधी एकत्र येणार? असा थेट प्रश्न विचारण्यात आला, याला उत्तर देताना ते मला माहीत नाही असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून बारामतीत आहेत. शनिवारी (दि. 31) पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत प्रश्न विचारला असता, मला माहीत नाही, असे सांगत अवघ्या तीन शब्दात प्रश्न निकाली काढला. काही दिवसांपासून शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील एक गट अजित पवारांबरोबर जाण्याच्या मन:स्थितीत आहे, असे सांगितले होते. (Latest Pune News)
बारामतीत मात्र त्यांनी या प्रश्नाला बगल दिली.राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन 10 जूनला असतो. 10 जूनपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, अशी चर्चा सध्या सुरू आहे. सोशल मीडियात वारंवार याबाबत चर्चा सुरू असते. शरद पवार यांनीदेखील यासंदर्भातील माहिती काही दिवसांपूर्वीच प्रसारमाध्यमांना दिली होती. मात्र, शनिवारी त्यांनी त्यावर बोलणे टाळत, मला काहीही माहिती नाही, असे सांगितले.