monsoon update 
पुणे

Monsoon update | मान्सूनने हुलकावणी दिली, पण २५ जून पासून सक्रीय होणार!

हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मान्सूनने जून महिन्यातील सुमारे १८ दिवस हुलकावणी दिली.अजून पुढचे सहा दिवस तो बरसणार नाही.मात्र २५ जून ते १ जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे.तो चांगला सक्रीय होणार आहे. असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

गुरुवारी रात्री उशीरा भारतीय हवामान विभागाने २५ जून ते १ जुलै दरम्यान देशातील मान्सून बाबतचा अंदाज जाहिर केला. देशात १८ जून पर्यंत ३८ टक्के सरासरी पाऊस घटल्याचे जाहिर केले.सर्वात कमी पाऊस मध्य भारतात ज्यात महाराष्ट्राचा समावेश आहे तेथे तब्बल ६२ टक्के कमी झाल्याचे सांगितले आहे.

असा आहे अंदाज...(२५ जून ते १ जुलै २०२६)

- मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल परिस्थिती निर्माण होईल.

-मान्सून वारे मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, ओडिशा, झारखंड, बिहार, तसेच उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश,उत्तर प्रदेशच्या काही भागांत पुढे सरकतील.

-हंगामी 'ट्रफ' (कमी दाबाचा पट्टा) त्याच्या सामान्य स्थितीजवळ राहण्याची शक्यता आहे; मात्र २५ जूननंतर त्याचे पूर्वेकडील टोक दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आहे.

-'सोमाली जेट' (कमी उंचीवरील सोमाली जेट प्रवाह) अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दक्षिण अरबी समुद्रावरील विषुववृत्त-ओलांडणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहात वाढ होईल.

-मध्य आणि द्वीपकल्पीय भारतावर वातावरणाच्या खालच्या थरात (ट्रोपोस्फिअरच्या खालच्या भागात) पश्चिमेकडील वाऱ्यांचे (वेस्टर्लीजचे) वर्चस्व राहण्याची शक्यता आहे.

- मध्य अरबी समुद्रावर वातावरणाच्या मध्यम उंचीवर (मध्य ट्रोपोस्फिअरमध्ये) चक्राकार वारे (सायक्लोनिक सर्क्युलेशन) निर्माण होण्याची शक्यता आहे.

-पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत 'पूर्व-पश्चिम शिअर झोन' (वाऱ्यांच्या वेगातील किंवा दिशेतील बदलाचा पट्टा) विस्तारण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT