पुणे

Monsoon Update : राज्यात पाऊस वाढला, कोकण-घाटमाथ्यावर १० ऑगस्टपर्यंत मुसळधार; उर्वरित भागात हलका ते मध्यम

भिरा ३००, महाबळेश्वर २२१ मि.मी.

पुढारी वृत्तसेवा

पुणे : राज्यात कोकणसह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. या भागात १० ऑगस्टपर्यंत मुसळधार, तर उर्वरित भागांत हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारी घाटमाथ्यावर विक्रमी पावसाची नोंद झाली. भिरा ३००, तर महाबळेश्वरमध्ये २११ मिलिमीटर पाऊस झाला.

पूर्वोत्तर भारतात चक्रिय स्थिती तयार झाल्यामुळे त्या भागात मान्सून जोरदार सक्रिय झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण आणि घाटमाथा भागात अतिवृष्टी सुरूच आहे. तर, उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. असाच पाऊस १० ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. मंगळवारी राज्यातील बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावली. घाटमाथ्यावर सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरूच आहे. राज्यातील बहुतांश भागात दाट बाष्पयुक्त ढगांची गर्दी झाल्याने जोरदार ते संततधार पाऊस होण्याची शक्यता वाढली आहे.

सोमवारी झालेला पाऊस (मि.मी.)

घाटमाथा : भिरा ३००, दावडी २१८, डोंगरवाडी १९७, ताम्हिणी १९०, लोणावळा, शिरगाव १६०, कुंडले ११६, आंबोणे ११०, खंद १०५, पोफळी १०४, लोणावळा ९८, नलशी ८३, वळवण, भिवपुरी ८२, मुळशी ७९, शिरोटा ७४, मुळशी ७०, वाणगाव ६१, कोयना, खोपोली ६०.

कोकण : वाळपोई १४२, मुरबाड ८०, लांजा ७१, सुधागड- पाली ६५, माणगाव, खेड, वाकवली ५८, केपे ५७, सांगे ५४, कर्जत, मंडणगड ४८, फोंडा ४५, संगमेश्वर- देवरुख ४४.

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर २२१, लोणावळा १२४, राधानगरी १०.७, गगनबावडा ९४, पेठ ५७, भडगाव ४५.

मराठवाडा : पालम ५८, बिलोली ४५, कंधार ४१, नायगाव- खैरगाव ३६, रेणापूर ३३, गंगाखेड ३२, भूम ३०, अहमदपूर २६, परांडा २५, भोकर २४, जालना, लोहा, धाराशिव २२.

विदर्भ : सिरोंचा ७६, अहेरी ५१, बुलढाणा ११.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT