मान्सून हंगामात मराठवाडा अव्वल; यंदाचा मान्सून हंगाम शंभर वर्षांतील सर्वात वेगळा Pudhari Photo
पुणे

Monsoon 2025: मान्सून हंगामात मराठवाडा अव्वल; यंदाचा मान्सून हंगाम शंभर वर्षांतील सर्वात वेगळा

जून ते सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा 39 टक्के जास्त पाऊस

पुढारी वृत्तसेवा

पुणे: यंदाचा मान्सून हंगाम गत शंभर वर्षांतील सर्वात वेगळा ठरला आहे. कमी पर्जन्यमानाचा भाग म्हणून ओळखला जाणारा अवघा मराठवाडा अतिवृष्टीने जलमय झाला असून, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या सरासरीत राज्यात अव्वल ठरला आहे. राज्यात सरासरी 20 टक्के अधिक पाऊस झाला. मराठवाडा, विदर्भात 15 तर मध्य महाराष्ट्रात 20 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

यंदा मराठवाड्यात जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज 15 एप्रिल रोजी हवामान विभागाच्या दिल्ली मुख्यालयाने दिला होता, तो तंतोतंत खरा ठरला. मात्र त्यात धोक्याची सूचना महिनावार प्रादेशिक हवामान केंद्र देण्यात अपयशी ठरली. गत शंभर वर्षांत यंदा मराठवाड्यात मान्सून हा सर्वात वेगळा ठरला. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भाला चार महिन्यांच्या सरासरीत मराठवाड्याने मागे टाकत 39 टक्के जास्त पावसाची नोंद केली. (Latest Pune News)

सर्वाधिक पाऊस धाराशिव, नांदेडमध्ये...

मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक 63 टक्के तर त्यापाठोपाठ नांदेड 50 टक्के, बीड 45 टक्के इतका पाऊस झाला आहे. दरवर्षीची सरासरी 639 मि.मी. ची असली तरीही यंदा 39 टक्के अधिक म्हणजे तब्बल 890 मि. मी पाऊस झाला आहे.

सर्वात कमी पाऊस सांगली जिल्ह्यात...

राज्यात सर्वात कमी पावसाचा एकच जिल्हा सांगली असून, तेथे उणे 20 टक्के पाऊस झाला आहे. गत पाच वर्षांपासून सांगली जिल्ह्यात कमी पाऊस पडत आहे. त्यापाठोपाठ अकोला (उणे 4), अमरावती (उणे 8) टक्के इतका कमी पाऊस झाला आहे. मात्र राज्यात यंदा एकही जिल्हा अवर्षणग्रस्त ठरला नाही.

महाराष्ट्र राज्य स्थिती : (20 टक्के जास्त) (सरासरी : 863.1,पडला :933.5 मि.मी.)

विभागवार पावसाची टक्केवारी

मराठवाडा : (39 टक्के जास्त)

धाराशिव: 63, नांदेड 50, बीड: 45, लातूर: 48,

छ. संभाजीनगर: 43 टक्के, परभणी: 32, हिंगोली: 15, जालना 4

मध्य-उत्तर महाराष्ट्र: (20 टक्के जास्त)

अहिल्यानगर : 33, कोल्हापूर 27, नाशिक 48, पुणे 16, सांगली 15, धुळे 10, जळगाव 12, नंदुरबार 7, सोलापूर 21, सातारा (उणे 20)

कोकण (मुंबईसह): (15 टक्के जास्त)

मुंबई शहर 7, मुंबई उपनगर 34, पालघर 40,

रायगड 15, रत्नागिरी 16, सिंधुदुर्ग 3, ठाणे 12

विदर्भ (15 टक्के जास्त)

अकोला (उणे 4), अमरावती (उणे 8),

भंडारा 7, बुलडाणा 11, चंद्रपूर 21,

गडचिरोली 26, नागपूर (10),

वर्धा 24, वाशिम 23,

यवतमाळ 27,

मराठवाडा: (39 टक्के जास्त) (सरासरी : 639.7, पडला : 890.7 मि. मी.)

मध्य महाराष्ट्र : (20 टक्के अधिक) (सरासरी : 743.1, पडला : 894.3 मि. मी.)

कोकण : (15 टक्के अधिक) (सरासरी : 990.7, पडला : 1186.7 मि. मी.)

विदर्भ : (15 टक्के अधिक) (सरासरी : 934.2,पडला : 1071.5 मि. मी.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT