Wrestling Pudhari
पुणे

Maharashtra Kesari Wrestling: पुण्यातील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 1500 मल्लांचा सहभाग, आकर्षक बक्षीस

गदा, फॉर्च्युनर गाडी, मोटारसायकली आणि सुवर्णपदकांसह विजेत्यांचा गौरव

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाशी संलग्न असलेल्या राज्यातील 42 जिल्हा कुस्ती संघांमधून सुमारे 1500 मल्ल या स्पर्धेत सहभागी होत आहेत. राज्यातील अनेक नामांकित, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती आयोजक रामकृष्ण सातव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्याला कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ दिली जाणारी महाराष्ट्र केसरीची मानाची गदा केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने देण्यात येणार आहे. याच बरोबर फॉर्च्युनर गाडी सुद्धा दिली जाणार आहे.

68 वे अधिवेशन पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे रंगणार आहे. ही स्पर्धा 18 ते 22 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातील स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून क्रीडानगरीला मस्व. अजितदादा पवार क्रीडानगरीफ असे नाव देण्यात आले आहे.

स्पर्धेचे उद्घाटन 18 मार्च रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर, 22 मार्च रोजी समारोप व बक्षीस वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेत उपमहाराष्ट्र केसरी विजेत्याला स्कॉर्पिओ एन गाडी, तर माती व गादी विभागातील विविध वयोगटातील सुवर्णपदक विजेत्यांना एकूण 18 बुलेट मोटारसायकली, रौप्यपदक विजेत्यांना स्प्लेंडर मोटारसायकल देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी मातीचे दोन आणि मॅटचे दोन असे एकूण चार आखाडे उभारण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT