पुणे

Heavy Rainfall Alert : महाराष्ट्रात ३-४ जुलैला अतिवृष्टीचा इशारा, अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार झाल्याचा परिणाम

गेल्या २४ तासांत सर्वदूर चांगला पाऊस, ‘अशी’ आहे मान्सूनची स्थिती

पुढारी वृत्तसेवा

पुणे : राज्यात गत २४ तासांत दमदार पाऊस झाला असून, कोकणातील काही भागांत अतिवृष्टी ते मुसळधार, तर राज्यात सर्वदूर मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, राज्याला ३ आणि ४ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्राला अतिमुसळधारेचा ऑरेंज अलर्ट, तर विदर्भ, मराठवाड्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार झाल्याने थांबलेला मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे जुलैची सुरुवात मुसळधार पावसाने होणार आहे. सोमवारी (दि.२९ जून) कोकणात अतिमुसळधार, तर उर्वरित भागात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. आगामी पाच दिवस राज्यात चांगल्या पावसाची शक्यता असून, कोकण, मध्य महाराष्ट्राला ३० जून ते ४ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

... अशी आहे मान्सूनची स्थिती

  • महाराष्ट्र किनारपट्टीलगत पूर्व : मध्य अरबी समुद्रावर निर्माण झालेली चक्रीय स्थिती कायम.

  • उत्तर मध्य : मध्य प्रदेशापासून सौराष्ट्र, उत्तर मराठवाडा ओलांडत अरबी समुद्रापर्यंत समुद्र सपाटीपासून ३.१ ते ४.५ कि.मी. उंचीवर एक द्रोणीय रेषा तयार झाली.

गत २४ तासांत राज्यात झालेला पाऊस ( मि.मी. मध्ये)

  • कोकण : म्हसळा २४०, दापोली १९३, वाकवली १८६, मंडणगड १८०, खेड १७२, चिपळूण १३५, माणगाव १३३, पोलादपूर १३०, पालघर १२२, पनवेल १२०, मुलडे ११३, तळा १०७, राजापूर, संगमेश्वर (देवरुख) १०४, वैभववाडी ९८, महाड ९७, कुडाळ ९२, केपे, काणकोण ९०, फोंडा ८५, लांजा, ठाणे ८४, गुहागर ८३, मडगाव ७७, श्रीवर्धन ७०, जव्हार ६३, कणकवली ५९, वसई ५८, रामेश्वर ५६, मालवण ५०.

  • मध्य महाराष्ट्र : लोणावळा ११८, गगनबावडा ११४, खेड (राजगुरुनगर) १०५, रावेर, नेवासा, वाई ४९, श्रीगोंदा, श्रीरामपूर, राधानगरी ४५, शाहूवाडी ४४, संगमनेर ३५, मोहोळ ३३, बारामती २२.

  • मराठवाडा : वैजापूर ४८, किनवट ४.२, लोहा, नायगाव (खैरगाव) ३७, रेणापूर, माहूर ३५, मुखेड ३२, धर्माबाद २९, अहमदपूर, सोनपेठ २८, जळकोट २६, लातूर २५, पाटोदा २४, शिरूर अनंतपाळ २३, केज, गाखेड २०, कलमनुरी, उमरी १९, गंगापूर.

  • विदर्भ : महागाव ५६, खरंगणा ५२, घाटंजी ४२, दारव्हा ३९, पुसद ३८, दिग्रस ३६, रामटेक ३३, साकोली ३२.

  • घाटमाथा : लोणावळा १६०, डुंगरवाडी १५८, वळवण, कोयना (पोफळी), ताम्हिणी १२५, लोणावळा (टाटा) १००, धारावी ८१, खोपोली ७५, शिरगाव ६०, भिवपुरी ५४, दावडी ५०, शिरोटा ४६.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT