Maharashtra heatwave | राज्यभरात उष्णतेची लाट, ऑक्टोबर हीटचा तडाखा सुरू Pudhari File Photo
पुणे

Maharashtra heatwave | राज्यभरात उष्णतेची लाट, ऑक्टोबर हीटचा तडाखा सुरू

रात्रीच्या तापमानातही वाढ; सावधगिरी बाळगण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे : परतीचा मान्सून कमकुवत असल्यामुळे तो न बरसताच राज्यातून पुढे जाण्याच्या तयारीत आहे. शुष्क अन्‌ कोरड्या वातावरणामुळे राज्यात उष्णतेची लाट सक्रिय झाली आहे. रविवारी (दि. ४) मालेगावचा पारा ३८.४ तर अमरावती शहराचा पारा ३८ अंशांवर गेला होता. बहुतांश भागाचे सरासरी तापमान ३७ अंशांवर गेले होते.

राज्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा जबरदस्त जाणवत आहे. त्यामुळे हवामान शास्त्रज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. हवामान तज्ज्ञां‍च्या मते, यंदा ऑक्टोबर हीटचा ताप हा दरवर्षीच्या तुलनेत खूप लवकर म्हणजे १५ दिवस आधीच जाणवू लागला आहे. रात्रीचे तापमानदेखील वाढल्यामुळे अस्वस्थ करणारे वातावरण राज्यात तयार झाले आहे.

परतीचा मान्सून आज मराठवाड्यातून जाणार

एकीकडे उन्हाचा त़डाखा वाढलेला असताना परतीचा मान्सून राज्याच्या ६० टक्के भागातून पुढे सरकला असून सोमवारी तो मराठवाड्यातून पुढे सरकणार आहे. दरम्यान, राज्यात दोन दिवस हलक्या पावासाचा अंदाज देण्यात आला आहे. परतीचा मान्सून सोमवारी मराठवाड्यासह राज्याच्या उर्वरित भागातून पुढे जाण्याच्या तयारीत आहे. तसेच छत्तीसगड, तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागांतून पुढील माघारीसाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

असा जात आहे मान्सून

नैऋत्य मोसमी वाऱ्यांची माघार रेषा रांची, रायपूर, ब्रह्मपुरी, परभणी, बारामती, करनई भागांमधून जात आहे. तसेच, बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती तयार झाल्यामुळे देशभरात हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. पूर्वोत्तर राज्यात पावसाचा जोर जास्त आहे. पण महाराष्ट्रात हवेचे दाब अनुकूल नसल्यामुळे पावासाचा जोर जेमतेम राहण्याची शक्यचा शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.

रविवारचे राज्याचे कमाल तापमान

मालेगाव ३८.४, अमरावती ३८, जळगाव ३७.४, पुणे ३४.८, अहिल्यानगर ३५, कोल्हापूर ३३.२, महाबळेश्वर २६.६, सांगली ३२.६, सातारा ३४.७, सोलापूर ३६.४, मुंबई ३६.५, सांताक्रूझ ३७.४, रत्नागिरी ३७.७, डहाणू ३७.९, अकोला ३७.१, बुलडाणा ३३.७, ब्रह्मपुरी ३५.२, चंद्रपूर ३५.४, गोंदिया ३३.८, नागपूर ३५.२, वाशिम ३५, वर्धा ३६.५, यवतमाळ ३६.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT