पुणे

पुणे : ’खेलो इंडिया यूथ गेम्स’मध्ये महाराष्ट्राचा दबदबा

अमृता चौगुले

देशामध्ये क्रीडासंस्कृती रुजावी आणि वाढावी, या हेतूने केंद्र सरकारने क्रीडा विभागाच्या सहकार्याने 'खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धा' सुरू केली आहे. 2023 पर्यंत पाच वेळा या स्पर्धा पार पडल्या असून, त्यापैकी 3 वेळा महाराष्ट्राच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावित आपला दबदबा कायम ठेवला आहे.

केंद्र सरकारच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली आणि पहिली स्पर्धा नवी दिल्ली येथे पार पडली. त्यानंतर दुसरी स्पर्धा पुणे, तिसरी गुवाहाटी, चौथी हरियाणा, तर पाचवी स्पर्धा मध्य प्रदेश राज्यात पार पडली. या स्पर्धेमध्ये दुसर्‍याच वर्षी 2019 मध्ये यजमान महाराष्ट्र संघाने 85 सुवर्णांसह एकूण 228 पदकांची लयलूट करीत अव्वल स्थान मिळविले. 2020 मध्ये आसाममधील गुवाहाटीत झालेल्या 'खेलो इंडिया' स्पर्धेमध्ये 78 सुवर्णपदकांसह 256 पदकांची लयलूट केली.

तर, 2023 मध्ये मध्य प्रदेश येथे झालेल्या स्पर्धेत 56 सुवर्णपदकांसह 161 पदकांची लयलूट करीत तिसर्‍यांदा विजेतेपद पटकाविले आहे. दुसर्‍या 'खेलो इंडिया यूथ गेम्स'मध्ये यजमान महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले. महाराष्ट्राने गतविजेत्या हरियाणाला मागे टाकत 85 सुवर्णांसह एकूण 227 पदकांची लयलूट केली. 62 सुवर्णांसह 178 पदके जिंकणार्‍या हरियाणाला उपविजेतेपदावर, तर 48 सुवर्णांसह 136 पदके जिंकणार्‍या दिल्ली संघाला तिसरे स्थान मिळाले.

एक वर्ष उपविजेतेपद

सन 2022 मध्ये हरियाणा येथील पंचकुला या ठिकाणी पार पडलेल्या स्पर्धेत हरियाणाने सर्वाधिक पदके मिळवली. पण, महाराष्ट्राच्या संघानेही उत्तम कामगिरी करीत 125 पदकांसह दुसरे स्थान मिळवले. यामध्ये तब्बल 45 सुवर्णपदके, 40 रौप्य आणि 40 कांस्य पदके खेळाडूंनी जिंकली.

सन 2022 मध्ये हरियाणा येथील पंचकुला या ठिकाणी पार पडलेल्या स्पर्धेत हरियाणाने सर्वाधिक पदके मिळवली. पण, महाराष्ट्राच्या संघानेही उत्तम कामगिरी करीत 125 पदकांसह दुसरे स्थान मिळवले. यामध्ये तब्बल 45 सुवर्णपदके, 40 रौप्य आणि 40 कांस्य पदके खेळाडूंनी जिंकली.

SCROLL FOR NEXT