शिवाजी शिंदे
पुणे : राज्यातील सर्वच भागात मे महिन्याच्या अंतिम टप्प्यात तसेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या टप्प्यात देखील पावसाची बँटिंग जोरात सुरू आहे. राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत गेली. त्यामुळे सध्या राज्यातील धरणसाठा सुमारे 60 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान या पाणीसाठ्यामुळे पुढील काही महिन्यांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. आतापर्यत राज्यातील नाशिक भागातील भाम आणि भावली ही दोन धरणे 100 टक्के भरली आहेत.
राज्यात मागील मे आणि जून महिन्यात सर्वच भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने सातत्याने हजेरी लावली. त्यामुळे वेळेच्या आधी धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्यास सुरूवात झाली त्यामुळे पाणीसाठा 50 टक्क्यांच्या पुढे गेलेला आहे.त्यातही मध्यमहाराष्ट्र, विदर्भ, नागपूर, नाशिक या विभागात पावसाची हजेरी सरासरीपेक्षा जास्त असल्यामुळेच या भागात धरणामध्ये पाणीसाठा इतर विभागातील धरणांपेक्षा जास्त असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.
दरम्यान राज्यातील सर्वच विभागात असलेल्या धरणामध्ये सध्या एकूणस 58.87 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत (मागील वर्षीची आकडेवारी 27.38 टक्के) सुमारे 31.48 टक्क्यांनी जास्त आहे.राज्यात जलसंपदा विभागाचे सहा विभाग आहेत. यासहा विभागात मोठी, मध्यम आणि लहान अशी मिळून 2 हजार 997 धरणे आहेत.
जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार सद्यस्थितीत राज्यातील छतपती संभाजीनगर विभागात इतर विभागापेक्षा कमी म्हणजेच 10.33 टक्के पाणीसाठा आहे. या उलट घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पाणी पडल्यानंतर या भागात असलेल्या बह्तांश भागातील धरणांमध्ये समाधानकरक पाणी आहे.
विदर्भचा काही भाग, मध्यमहाराष्ट्राचा काही भाग आणि कोकणात सर्वात पाऊस जास्त बसरला. त्यामुळे या भागातील बहुतेक सर्वच धरणांची पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे.असे जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.