पुणे : राज्यात थंडीची जोरदार लाट असून, ती १९ डिसेंबरपर्यंत सक्रिय राहणार आहे. शनिवारी जळगावचे तापमान राज्यात सर्वांत कमी ७ अंशांवर खाली आले होते, तर पुणे शहराचे तापमान ८.८ अंशांवर होते.
राज्यातील बहुतांश भागांत बोचरी थंडी सुटली असून, दुपारी ४ पासूनच गारठा जाणवत आहे. त्यामुळे नागरिक दिवसभर ऊबदार कपडे घालत आहेत. सायंकाळी ५ पासून सुरू झालेल्या गारठ्यात उत्तर रात्री दुपटीने वाढ होत आहे. तसेच पहाटे शहर अन् गावे धुक्यात हरवलेली दिसत आहेत. थंडीची ही लाट १९ डिसेंबरपर्यंत राहणार आहे. त्यानंतर किमान तापमानात किंचित वाढ होईल.
जळगाव ७, पुणे ८.८, अहिल्यानगर ७.५, कोल्हापूर १४, महाबळेश्वर १२.९, मालेगाव ८.६, नाशिक ८.६, सांगली ११.७, सातारा ९.५, सोलापूर १२.६, छ. संभाजीनगर ११.७, अकोला ११.७, अमरावती १०.९, बुलडाणा १३.२, ब्रह्मपुरी ११.९, चंद्रपूर १२, गोंदिया ९.२, नागपूर १०, वाशीम ११.२, वर्धा १०, यवतमाळ १०.५.