पुणेः नव्या वर्षात थंडी कमी होईल हा अंदाज चुकवत थंडी अधिकच वाढली आहे. त्यामुळे नव्या वर्षाचे स्वागत कडाक्याच्या थंडीने होणार असून जानेवारीचा पहिला आठवडा ही थंडी राहील, असा नवा अंदाज देण्यात आला आहे.
यंदाच्या हंगामातील डिसेंबर महिन्यातील सर्वांत मोठी थंडीची लाट सुरूच आहे. राज्यात २३ दिवस थंडीची सलग लाट सुरू असून ती जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.त्यामुळे गत वीस वर्षांतील ही थंडीची सर्वांत मोठी लाट ठरणार आहे.
अहिल्यानगर ८.४, पुणे ९.९,जळगाव १०.८, कोल्हापूर १४.३, महाबळेश्वर ११.६, मालेगाव १०.२, नाशिक ९.६, सांगली १२, सातारा १०.१, सोलापूर १४, छ.संभाजीनगर १०.६, परभणी ११.१, अकोला ११.५, अमरावती १०, बुलडाणा १३.२, ब्रम्हपुरी १०.४, चंद्रपूर ११, गोंदिया ८.६, नागपूर १०.२, वर्धा १०, यवतमाळ ८.८