पुणे : पहाटे आणि रात्री थंडीचा कडाका जास्त असला तरी दिवसभराचे सरासरी किमान तापमान गेल्या २४ तासांत किंचित वाढले आहे. मात्र गार वारे सुटल्याने थंडीची तीव्रता जास्त जाणवत आहे. शनिवारी नागपूर ९.६, तर पुणे १४.१ अंशांवर गेले होते.
राज्याच्या किमान तापमानात गत चोवीस तासांत किंचित वाढ झाली आहे. कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागात थंडीच्या लाटेन जोर धरला होता. मात्र काही तासांत किमान तापमानात वाढ झाली असली तरी बोचऱ्या वाऱ्याचा वेग वाढल्याने थंडीत वाढ झाली आहे.
नागपूर ९.६, गोंदिया ९.८, पुणे १४.१, अहिल्यानगर १२.४, जळगाव १२, महाबळेश्वर १३.२, मालेगाव ११.४, नाशिक ११.५, सांगली १९.६, सातारा १६.६, मुंबई २३.४, रत्नागिरी २४.२, छ.संभाजीनगर १२.५, बीड १२.८, अकोला १२.८, अमरावती १२.६, बुलडाणा १३.२, ब्रम्हपुरी १२.९, चंद्रपूर १३.२.