पुणे: राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, हुडहुडी भरविणारी थंडी पसरली आहे.बुधवारी जळगावात सर्वात कमी 9.1 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले.
मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, चंदिगढ ,छत्तीसगढ राज्यात थंडीची लाट पसरली आहे.यामुळे राज्यात येणाऱ्या थंड वाऱ्यात वाढ झाली असून, परिणामी हुडहुडी भरविणारी थंडी वाढली आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव जाणवत आहे. वातावरणात दिवसा देखील गारवा जाणवत आहे.सूर्यास्त लवकर होत असून, सायंकाळपासूनच गारठा जाणवत आहे.पहाटे बोचरी थंडी आणि धुक्यामुळे स्वेटर, मफलर, स्कार्फ बांधून नागरिक मॉर्निंग वॉक ला बाहेर पडत आहेत. उबदार कपडे खरेदी करण्यासाठी लगबग वाढत आहे.तसेच थंडीपासून बचावासाठी आता शेकोटी देखील पेटवल्या जात आहेत.
थंडी कायम
पुढील काही दिवस राज्यात कोरडे हवामान राहणार असून, थंडी कायम राहणार आहे. राज्यातील प्रमुख शहरात बुधवारी नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढील प्रमाणे
अहिल्यानगर 12.6, बीड 11.5,नाशिक 10.6, पुणे 13.7, महाबळेश्वर 12.5,रत्नागिरी 19.6, सातारा 15,माथेरान 17.4, डहाणू 17.6,कुलाबा 22.4,सोलापूर 17.1,छत्रपती संभाजी नगर 13,कोल्हापूर 18.1,सांताक्रुझ 18.6, सांगली 16.3,जेऊर 11,नांदेड 13.8,मालेगांव 11, अलिबाग 20.8, अकोला 12.7,अमरावती व भंडारा 12,बुलढाणा 13.4,, ब्रम्हपुरी 14.1,चंद्रपूर 13.6, गडचिरोली 13, गोंदिया 10.5, नागपूर 12.6, यवतमाळ 10.6 अंश सेल्सिअस