पुणे : संपूर्ण महाराष्ट्रभर बुधवारी (दि.3) घटस्थापनेनंतर नवरात्रौत्सवाची सुरुवात झाली आहे. याबरोबरच अनेक ठिकाणी नवरात्र उत्सावानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अशाच प्रकारे पुण्यातील सारसबाग परिसरामध्ये असणाऱ्या श्री महालक्ष्मी मंदिरालादेखील नवरात्र उत्सावानिमित्त मोहक अशी विद्युतरोषणाई केली आहे. याचे उद्घाटन बुधवारी (दि.3) सहाय्यक पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या नुकतेच करण्यात आले.