पुणे: वीज कनेक्शनच्या नावात बदलाच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्याची सुविधा महावितरणने सुरू केल्यानंतर राज्यातील वीज ग््रााहकांना त्याचा मोठा लाभ झाला आहे. दोन महिन्यांत 58 हजार 167 ग््रााहकांनी घरबसल्या नावात बदल (चेंज ऑफ नेम) करून घेतला. त्याचबरोबर वीज ग््रााहकांना मंजूर भार वाढवून घेण्यासाठी सुरू केलेल्या सुविधेचा 10 हजार 428 ग््रााहकांना लाभ झाला आहे.
खरेदी-विक्री, वारसा हक्क किंवा इतर कारणांमुळे घर किंवा इतर मालमत्तेच्या मालकीमध्ये बदल झाल्यानंतर वीजबिलाच्या ग््रााहक नावात बदल करण्यासाठी अर्ज करण्यात येतो. या प्रक्रियेसाठी महावितरण मोबाईल ॲप आणि संकेतस्थळावर वीजग््रााहकांना ‘लॉग-इन’द्वारे ऑनलाइन अर्ज सादर करता येतो. ग््रााहकाला कोणत्या कारणासाठी नाव बदलणे आवश्यक आहे त्याचा पर्याय निवडला की, त्यानुसार आवश्यक ते निवडक दाखले जोडावे लागतात. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया शुल्क भरल्यानंतर तीन ते सात दिवसात नावातील बदलाची प्रक्रिया पूर्ण होते.
साडेदहा हजार जणांचे वीजभारवाढीचे अर्ज मंजूर
महावितरणने लघुदाब वर्गवारीतील सर्व औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती व इतर ग््रााहकांच्या 157 केडब्ल्यू पर्यंत वीज भार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित पद्धतीने मंजुरी देण्यास प्रारंभ केला आहे. या सुविधेचा लाभ घेणाऱ्या ग््रााहकांची संख्या आता 10 हजार 428 झाली आहे व त्यांनी 69.37 मेगावॅट भार वाढवून घेतला आहे.