पुणे

ले. जन. अजयकुमार सिंह दक्षिण कमांडचे प्रमुख

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दक्षिण कमांडच्या प्रमुखपदी मंगळवारी 1 नोव्हेंबर रोजी लेफ्टनंट जनरल अजयकुमार सिंह यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी 1984 मध्ये राष्ट्रीय संरक्षण अकादमीत गुरखा रायफलमधून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. सर्व प्रकारच्या सैनिकी क्षेत्रांचा अनुभव त्यांना असून, हिमालयापासून वाळवंटी भागापर्यंतच्या क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. कमांडो स्कूल बेळगाव, काठमांडू दुतावास या ठिकाणी त्यांनी देशसेवा केली आहे. ले. जन. जे. एस. नैन 31 ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाले, त्यानंतर अजयकुमार सिंह यांनी पदभार स्वीकारला.

दक्षिण कमांडप्रमुख ले. जन. नैन सेवानिवृृत
दक्षिण कमांडचेे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन हे चाळीस वर्षांच्या लष्करी सेवेतून 31 ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांना समारंभपूर्व निरोप देण्यात आला. या वेळी एका समारंभात लष्कराच्या कमांडने शहिदांना श्रद्धांजली वाहिली. नॅशनल वॉर मेमोरिअल पुणे येथे पुष्पहार अर्पण केला. आपल्या लष्करी कारकिर्दीत नैन यांनी उत्तर काश्मीरमधील नियंत्रणरेषेवर वर्चस्व राखण्यासाठी जबाबदार असलेल्या इन्फंट्री डिव्हिजन आणि पश्चिम आघाडीवरील महत्त्वाच्या कॉर्प्सचे नेतृत्व केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT