वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड भागासह हवेली तालुक्यात जोरदार वादळी पावसाने जवळपास पाच हेक्टर क्षेत्रातील आंबाबागांचे नुकसान झाले आहे. तसेच इतर फळबागांचे व पिकांचे नुकसान झाले आहे. अद्यापही ढगाळ वातावरण असल्याने अवकाळी पावसाची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यंदा बाजारात हापूस आंब्याला चांगली मागणी आहे. असे असताना हातातोंडाशी आलेल्या आंब्याचे वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
खानापूर येथील शेतकरी मुरलीधर जावळकर म्हणाले, वादळ व पावसाने हापूस तसेच रायवळ आंब्याच्या कैर्या पडल्या. थोडेफार शिल्लक आंबेही पडत आहेत, त्यामुळे यंदा डोंगरी पट्ट्यात फारसे आंबे शिल्लक नाहीत. असे असताना हातातोंडाशी आलेल्या आंब्याचे वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खानापूर येथील शेतकरी मुरलीधर जावळकर म्हणाले, वादळ व पावसाने हापूस तसेच रायवळ आंब्याच्या कैर्या पडल्या. थोडेफार शिल्लक आंबेही पडत आहेत, त्यामुळे यंदा डोंगरी पट्ट्यात फारसे आंबे शिल्लक नाहीत.
सिंहगड, खानापूर, मणेरवाडी भागांसह हवेली तालुक्यातील जवळपास 50 शेतकर्यांच्या आंबा बागांचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून पंचनामे करण्यात आले आहेत. सुमारे पाच हेक्टर क्षेत्रातील आंब्यांचे नुकसान झाले आहे. इतर फळबागा व पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
– मारुती साळे, तालुका कृषी अधिकारी, हवेली