लोणीकाळभोर :
हवेली तालुक्यातील सहकारातील सर्वात मोठी, राजकीयदृष्टया अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या लोणी-काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. गेल्या पन्नास वर्षात पहिल्यांदाच ही निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात सर्व सभासदांचे एकमत आल्याने ही ऐतिहासिक निवडणूक प्रक्रिया पार पडली. या संस्थेवर हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
या निवडणुकीत प्रत्येक प्रवर्गासाठी एकूण चोवीस उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. गावच्या इतिहासात पहिल्यांदाच सामंजस्याची भूमिका घेऊन निवडणूक प्रक्रिया बिनविरोध होण्यासाठी प्रशांत काळभोर यांची भूमिका महत्वाची ठरली. केवळ एकच उमेदवार प्रत्येक जागेसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली देसाई यांनी ही निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे जाहीर केले.
सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी मतदारसंघ: रमेश यशवंत भोसले, बाळासाहेब जयवंत काळभोर, राहुल दत्तात्रय काळभोर, गुरुदेव दत्तात्रय काळभोर, सागर बाळासाहेब काळभोर, संजय लक्ष्मण काळभोर, बाळासाहेब पर्वतराव काळभोर, सचिन मुरलीधर काळभोर,
महिला प्रतिनिधी: राजश्री उदय काळभोर, वर्षा मयुर काळभोर
अनुसूचित जाती / जमाती प्रवर्ग: संजय भिमराव भालेराव, इतर मागास प्रवर्ग: हेमंत गंगाराम गायकवाड,वि.जा/भ.ज./वि.मा.प्रवर्ग: अमोल सिदु कोळपे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
मागील कार्यकाळात आम्ही सर्वांनी मिळून संस्थेचा कारभार पारदर्शक केला. संस्था नफ्यात आणली शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबविले. कर्ज वाटप केल्यानंतर वसुली ही शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे केली. या सर्व चांगल्या कारभारामुळे सर्व शेतकरी सभासदांनी आम्हाला बिनविरोध निवडून देऊन पुन्हा काम करण्याची संधी दिली. या पुढेही आम्ही शेतकरी हिताचे धोरण राबवणार आहे.प्रशांत काळभोर पॅनेल प्रमुख,संचालक,हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती