पुणे

LokSabha Elections 2024 : मेट्रो वाहतुकीचा सक्षम पर्याय : मुरलीधर मोहोळ

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आयटी हब असलेल्या हिंजवडीला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारा शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो प्रकल्प अतिशय महत्त्वाकांक्षी असून, त्यामुळे नागरिकांना वेगवान, सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय मिळणार असल्याचा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. शिवाजीनगर गावठाण परिसरात आयोजित केलेल्या प्रचार फेरीच्या सांगता सभेत ते बोलत होते. आमदार सिद्धार्थ शिरोळे, दत्ता खाडे, आदित्य माळवे, रवींद्र साळेगावकर, सुनील पांडे, गणेश बगाडे, किरण ओरसे, डॉ. अजय दुधाने, हेमंत डाबी, अपर्णा कुर्‍हाडे, सचिन वाडेकर, सचिन मानवतकर, दयानंद इरकल, आकाश रेणुसे, संजय तुरेकर यांचा प्रचार फेरीत प्रमुख सहभाग होता.

या वेळी मोहोळ म्हणाले, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत पीएमआरडीए सार्वजनिक खासगी भागीदारीतून हा प्रकल्प साकारला जात आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी 23.3 किलोमीटर असून या मार्गावर स्थानकांची संख्या 23 इतकी आहे. हिंजवडी, वाकड, बालेवाडी, बाणेर, औंध, गणेशखिंड, खैरेवाडी, शिवाजीनगर आदी भागांना एकमेकांशी जोडणारा हा प्रकल्प आहे. भविष्यात हडपसर व लोणी काळभोरपर्यंत विस्ताराची योजना आहे. सध्या प्रकल्पाचे 55 टक्के काम पूर्ण झाले असून, मे 2025 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणार आहे.

गावठाणातील रोकडोबा मंदिरापासून प्रचार फेरीचा प्रारंभ झाला. गणेश मंडळे आणि सामाजिक संस्थांनी उत्साहात स्वागत केले. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले. शिवाजीनगर गावठाण, तोफखाना, जंगली महाराज रस्ता, गोखले स्मारक चौक, फर्ग्युसन कॉलेज रस्ता मार्गे ज्ञानेश्वर पादुका चौकात प्रचार फेरीची सांगता झाली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT