पुणे

नाव यादीत न आल्याने अनेकांची नाराजी..!

Laxman Dhenge

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात टाकळी हाजी, कवठे येमाई, मलठण, निमगाव दुडे, म्हसे, डोंगरगण, आमदाबाद, रावडेवाडी, माळवाडी, शिनगरवाडी येथे दिवसभरात शांततेने मतदान पार पडले. सकाळी शेतातील कामामुळे बहुतांश शेतकरी उशिरा मतदानाला बाहेर पडले. नवोदित मतदार व ज्येष्ठ नागरिकांनीही आवर्जून मतदानाचा हक्क बजावला. सव्वापाच वाजता अचानक पाऊस सुरू झाल्याने काही मतदारांना सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रापर्यंत पोहचता आले नाही. सहानंतर आलेल्या मतदारांना मात्र मतदान न करताच परतावे लागले.

तसेच, अनेक मतदारांना मतदान यादीतून नाव गायब झाल्याने निराशा पत्करावी लागली. काही मतदारांची नावे दुसर्‍या गावांमध्ये गेली, तर काहींचे मागील वेळी मतदान करूनही या वेळी मतदान यादीत नाव आले नाही, असा अनुभव अनेकांना आल्याने मतदारांमधून नाराजी व्यक्त झाली. यामध्ये मुंबई, पुणे तसेच बाहेरगावाहून आलेले आणि काही स्थानिक मतदारांचा समावेश आहे. मतदान यादीत नाव न आल्याने भ्रमनिरास झालेल्या टाकळीहाजी, माळवाडी येथील काही मतदारांना अश्रू अनावर झाले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT