पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढविणारे वसंत मोरे यांनी शुक्रवारी गुपचूप जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. एरवी माध्यमांच्या गराड्यात असणारे आणि सातत्याने समाजमाध्यमांवर चमकणारे मोरे यांनी गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पदाधिकार्यांनी नकारात्मक अहवाल दिल्यामुळे मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिला होता.
मोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे चार कोटी 16 लाख 67 हजार 364 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. मोरे यांच्यावर तीन कोटी 49 लाख 23 हजार 439, पत्नीवर 18 लाख 89 हजार, तर मुलावर 47 हजार 147 रुपयांचे कर्ज आहे. मोरे यांच्यावर सात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे 70 ग्रॅम, पत्नीकडे 270 ग्रॅम सोने आहे. तसेच, पुणे जिल्ह्यातील सहा ठिकाणी शेतजमीन आहे.
हेही वाचा