पुणे

Loksabha election 2024 : मतदारांचे फुले देऊन स्वागत होणार

Laxman Dhenge
पुणे : पुढारी वृत्तसेवा : मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांमधील 21 मतदान केंद्रांमध्ये मतदानासाठी येणार्‍या मतदारांचे फुले देऊन स्वागत करण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक अशी ही 21 आदर्श मतदान केंद्रे जिल्हा निवडणूक शाखेने निश्चित केली आहेत. जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यानुसार जुन्नरमध्ये जिल्हा परिषद शाळा, वडगाव आनंद, आंबेगावमध्ये जिल्हा परिषद शाळा पूर्वाभिमुख उत्तरेकडून खोली क्र. एक, खेड-आळंदीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाकी खुर्द, शिरूरमध्ये न. पा. सेंट्रल स्कूल घोड नदी, दौंडमध्ये सेंट सेबॅस्टियन हायस्कूल, दौंड, इंदापुरात श्री. एन. आर. हायस्कूल इंदापूर, बारामतीमध्ये नवमहाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पणदरे, पुरंदरमध्ये ऑर्कडि इंटरनॅशनल स्कूल, भोरमध्ये ब्लू रिज पब्लिक स्कूल, हिंजवडी उत्तरमुखी, पश्चिमेकडून खोली क्र. चार आणि मावळात ऑक्सिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल, मेन बिल्डिंग, लोणावळा या ठिकाणी आदर्श मतदान केंद्रे असणार आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली.

पुण्यातील आदर्श मतदान केंद्रे

  • वडगाव शेरी – कै. तुकाराम धोंडिबा पठारे प्राथमिक विद्यालय, शारदाबाई पवार (एस.पी.) इंग्लिश मीडियम स्कूल, आयटी पार्क, खराडी
  • शिवाजीनगर – आयटीआय, औंध
  • कोथरूड – सी. एम. इंटरनॅशनल स्कूल, एसकेपी कॅम्पस, बाणेर-बालेवाडी खडकवासला – सर्वेक्षण क्र. दहा, सनसिटी, वडगाव बु., कम्युनिटी हॉलसमोर टेनिस हॉल
  • पर्वती – प्रगती विद्यालय
  • हडपसर – युनिवर्सल पब्लिक स्कूल, ससाणेनगर, काळेपडळ रस्ता, हडपसर
  • पुणे कॅन्टोन्मेंट – अल्पबचत भवन, ग्रीन रूम, क्वीन्स गार्डन
  • कसबा पेठ – टिळक आयुर्वेद विद्यालय, रास्ता पेठ
मतदान वाढावे, एकूणच मतदानाबाबत जनजागृतीसाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक आदर्श मतदान केंद्र निश्चित केले आहे. मतदान केंद्रांवर आल्यानंतर मतदारांना प्रसन्न वाटावे, आनंद वाटावा यासाठी त्यांचे कर्मचार्‍यांकडून स्वागत व्हावे, असे या मतदान केंद्रात अपेक्षित आहे. या मतदान केंद्रांची सजावट करण्यात येणार आहे. या ठिकाणी 'सुस्वागतम्' असे लिहिलेली रांगोळी, दारावर फुलांची सजावट, फुलांचे तोरण लावणे अपेक्षित आहे. तसेच, मतदानाच्या सुरुवातीला काही मतदारांना फुले देऊन त्यांचे स्वागत करण्याचे नियोजन आहे.
– मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT