पुणे

Baramati Lok Sabha : बारामती मोठ्या साहेबांचीच; सुप्रिया सुळे विजयी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बारामतीत २४ व्या फेरी अखेर सुप्रिया सुळेंनी ७ लाख २८ हजार ०६८ मतांनी विजयी आघाडी घेतली आहे. सुरुवातीपासून सुप्रिया सुळेंनी आघाडी घेतली होती. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पिछाडीवर होत्या. यावरून आता बारामतीकर सुप्रिया सुळेंच्या पाठीशी असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

२४ व्या अंतिम फेरीत सुप्रिया सुळे यांनी ७ लाख २८ हजार ०६८ मते  मिळवली आहे. तर सुनेत्रा पवार यांना ५ लाख ७४ हजार ५३८ मते मिळाली आहेत. या शेवच्या मतमोजणी फेरीत सुप्रिया सुळे १ लाख ५३ हजार ०४८ मतांनी विजयी आघाडी घेतली आहे. अद्याप पोस्टल मते समाविष्ट झाली नाहीत. बारामतीत मतमोजणीच्या फेऱ्या संपल्या आहेत.

आज मतमाेजणीत सुप्रिया सुळे यांनी निर्णायक आघाडी घेतली. यानंतर सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर हटवण्यात आले. सुळे यांच्‍या विजयाकडील वाटचाल सुरु असल्‍याचे स्‍पष्‍ट झाल्‍यानंतर  कार्यकर्ते जल्‍लाेष करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT