पुणे

पुणे: फटाक्याच्या स्फोटात लहान मुलगा जखमी

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: फटाका पेटवताना झालेल्या स्फोटात लहान मुलगा जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर शहरात झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने शहरात 17 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या, तर नर्‍हे भागात एक मुलगा जखमी झाला.

शिवांश अमोल दळवी असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली. फटाका फुटल्यामुळे मुलाचे कपाळ भाजले असून, सुदैवाने डोळ्यांना इजा पोहोचली नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी यासाठी जनजागृती करण्यात येत आहे, तसेच फटाकेमुक्त दिवाळीसाठी अनेक संस्था संघटनांच्या माध्यमातून जनजागृतीही केली जाते; पण असे असले तरी अशा या फटाक्यांच्या आतिषबाजीने मोठ्या प्रमाणावर आगीच्या घटना घडत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT