पुणे

पुणे जिल्ह्यातील 21 धरणांत 50 टक्क्यांहून कमी साठा

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : यंदा एल निनोमुळे मॉन्सून लांबणीवर जाण्याची शक्यता असून, जून-जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस होणार नसल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आतापासून उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. जिल्ह्यातील भीमा खोर्‍यातील 26 धरणांपैकी 21 धरणांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे पुढील चार महिने पिण्यासाठी तसेच शेतीला पाणी मिळेल, असे नियोजन पाटबंधारे विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थांना करावे लागणार आहे.

जिल्ह्यात उजनीसह लहान मोठी एकूण 26 धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता 198.34 टीएमसी एवढी आहे. त्यापैकी धरणांत 202.67 टीएमसी म्हणजेच 102 टक्के पाणीसाठा झाला होता. पाच ते सहा महिन्यांत पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. त्यामुळे धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी साठा आहे. सध्या धरणांत 63.92 टीएमसी म्हणजेच अवघा 32 टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षी धरणांत 89.08 टीएमसी म्हणजेच 44 टक्के पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांत 25.16 टीएमसी पाण्याची घट झाली आहे.

SCROLL FOR NEXT