पुणे

हापूसबाग येथे बिबट्याची मादी जेरबंद

अमृता चौगुले

लेण्याद्री : पुढारी वृत्तसेवा :  हापूसबाग (ता. जुन्नर) येथील ऐतिहासिक हाबशी महाल परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजर्‍यात बिबट्याची मादी जेरबंद झाली. गेल्या आठवड्यात येथील पुलावरून जाणार्‍या दुचाकीस्वारावर बिबट्याने हल्ला केला होता. तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ले करणारे बिबटे ग्रामस्थांना नेहमीच दर्शन देत होते. त्यामुळे वन विभागाने या बिबट्यांसाठी दोन ठिकाणी पिंजरे लावले होते. मात्र, बिबट्या येत नव्हता. येथील महाल परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्यावर तेथे पिंजरा लावण्यात आला आणि गुरुवारी (दि. 7) रात्री बिबट्याची मादी जेरबंद झाली, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण व वनपाल नितीन विधाटे यांनी दिली.

दरम्यान, पूर्ण वाढ झालेली अंदाजे 6 वर्षे वयाची ही बिबट्याची मादी असून, तिला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात हलविण्यात आले. या वेळी वनरक्षक स्वरूप रेंगडे, रोहिदास मिसाळ, संतोष भालेकर, पंढरी भालेकर, अंकुश पारधी व गावकर्‍यांनी मदतकार्य केले. हापूसबाग परिसरात अजून एक किंवा दोन बिबट्यांचे वास्तव्य असून, वन विभागाने त्यांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील सुजित मेहेर व ग्रामस्थांनी केली आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT