पुणे

तळेगाव ढमढेरे : धावत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला

अमृता चौगुले

तळेगाव ढमढेरे; पुढारी वृत्तसेवा : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील कासारी फाटा रस्त्याने जाणार्‍या एका इसमाच्या धावत्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला. हल्ल्यात दुचाकीस्वाराची पत्नी व मुलगा किरकोळ जखमी झाले. तळेगाव ढमढेरे येथील नवनाथ नरके हे पत्नी ऊर्मिला व मुलगा विराज यांच्यासह दुचाकीवरून नातेवाइकांकडे गेले होते.

मंगळवारी (दि. 11 एप्रिल) 10 वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून कासारी फाटा मार्गे घरी येत असताना अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकीच्या दिशेने झडप मारली. बिबट्या झडप मारत असल्याचे लक्षात येताच नवनाथ यांनी दुचाकीचा वेग वाढविल्यामुळे पत्नी व मुलाच्या पायावर बिबट्याचा पंजा लागला. दोघे किरकोळ जखमी झाले. दरम्यान, परिसरात बिबट्याची पाहणी करून वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल, असे नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT