पुणे

पारगाव : बिबट्याच्या हल्ल्यात धनगर मेंढपाळाचा घोडा मृत्युमुखी

अमृता चौगुले

पारगाव; पुढारी वृत्तसेवा: नागापूर येथील मिंडे वस्तीत बिबट्याच्या हल्ल्यात धनगर मेंढपाळाचा घोडा मृत्युमुखी पडल्याची घटना ४ सप्टेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. ज्ञानदेव दामू माने या धनगर मेंढपाळाचा गेल्या चार महिन्यात हा चौथा घोडा बिबट्याने ठार केला आहे. धनगर मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागापूर ते मंचर रस्त्यावर मिंडेवस्ती नजिक ज्ञानदेव दामू माने (मुळ रा. शिंदोडी साकुर मांडवे, ता. संगमनेर) येथील धनगर मेंढपाळाचा वाडा गेली तीन दिवसांपासून वास्तव्यास आहे.

शनिवारी (दि. ३) बिबट्याने वाड्यामधील एका कोकराला उचलून नेऊन त्याचा फडशा पाडला होता. त्यानंतर ४ सप्टेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास बिबट्याने पुन्हा वाड्यावर हल्ला करून त्यातील एका घोड्याला जागीच ठार केले. विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यात हि चौथी घटना घडली आहे. वनविभागाकडून आतापर्यंत केवळ एका घोड्याची नुकसान भरपाई मिळाली आहे. मेंढपाळ ज्ञानदेव माने यांनी रात्री वाड्याभोवती विजेची सोय केली आहे. तरी देखील सलग दोन रात्री बिबट्याने हल्ला करून जनावरांना ठार मारले. या प्रकारामुळे धनगर मेंढपाळांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT