लेण्याद्री: शांतीबह्म एकनाथषष्ठी उत्सवानिमित्त एकनाथवाडी (सावरगाव) येथे निमंत्रित 20:20 बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत 140 बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी रोख रकमेसह आकर्षक ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात आली तसेच फायनलसाठी सात मोठ्या रकमेची बक्षिसे व घाटाचा राजा म्हणून मानाची ट्रॉफी यावेळी यात्रेचे खास आकर्षण होते.
जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर व मावळ तालुक्यातील बैलगाडामालकांनी आपला सहभाग नोंदविला. यामध्ये घाटाचा राजा व प्रथम क्रमांक फायनल विजेते : कार्तिकराजे अक्षय बांगर व सिद्धेश बांगर तसेच प्रथम क्रमांक फळीफोड : नानासाहेब गुळवे व प्रशांत डोंगरे तसेच सागर ढमढेरे, विनोद कुमकर व मंगेश मुळे, दादाभाऊ मनसुख व तुषार वाबळे, भिकाजी चव्हाण व पुष्कर शेटे, ज्ञानेश्वर चव्हाण, अक्षय सोलाट व भगवान शिंदे, सचिन गव्हाणे, कार्तिकीराजे बांगर व सिद्धेश बांगर, प्रकाश शरद कबाडी आदी जुगलबंदीसह 10 प्रथम क्रमांकात बैलगाडा आले.
तर एकूण 11 बैलगाडा द्वितीय क्रमांकात आले, अशी माहिती बैलगाडा शर्यत उत्सव समितीचे अध्यक्ष सावकार मनसुख व उपाध्यक्ष राजेश मनसुख, अनिल मनसुख, दादाभाऊ मनसुख, संदीप मनसुख, रवींद्र मनसुख, सुवेश मनसुख यांनी दिली. तसेच पुणे व मुंबईकर तरुण मंडळी व एकनाथवाडी ग््राामस्थ यांचे मोठे सहकार्य लाभले.