Baramati Election Laxman Hake pudhari
पुणे

Baramati Election Laxman Hake: सुनेत्रा पवारांचा कॉल अन् लक्ष्मण हाकेंनी तलवार केली म्यान... बारामती पोट निवडणुकीतून माघार

Laxman Hake With Draws From Baramati By Election: १८ महामंडळाचे अध्यक्ष अजून भरले नाहीत...समय सुचकता अन् दोन पावलं मागं... म्हणत हाकेंनी माघारीबाबत केलं सुचक वक्तव्य

Anirudha Sankpal

Laxman Hake With Draws From Baramati By Election: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीमधील पोट निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही अशी घोषणा केली होती. मात्र आज अर्ज भरण्याच्या दिवशी लक्ष्मण हाके यांनी आपली तलवार म्यान केली असून त्यांनी बारामती पोटी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. याबाबत दत्तात्रय भरणे यांनी मध्यस्थी केली.

माघारीबाबत बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, सहानभूतीची लाट असतानाही मी निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मी ओबीसी नेता आहे मी या निवडणुकीच्या माध्यमातून काही मुद्दे आक्रमकपद्धतीनं मांडणार होतो. मला राज्यातील वरिष्ठांचे कॉल आले. ज्यावेळी सुनेत्रा वहिनींचा कॉल आला त्यावेळी मी माघार घेतली. मी या निवडणुकीनंतर थांबणार नाही. मी माझे प्रश्न सुनेत्रा पवार, फडणवीस आणि शिंदे यांच्याकडे मांडणार आहे.

माझा अनेक वर्षापासून बारामतीशी कनेक्ट

बारामती पोट निवडणुकीतून माघार का घेतली याबाबत सांगताना हाके म्हणाले, 'माझा अनेक वर्षापासून बारामतीशी कनेक्ट आहे. मी अनेक प्रश्नांवरती आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे. दादांच्या दुःखद निधनानंतर आणि त्याच्या आगोदर हे दोन वेगळे भाग आहेत. मी सांगितलं होतच की लोकांचा आग्रह आहे की मी निवडणूक लढवावी. मात्र राज्यातील एवढ्या वरिष्ठ लोकांचे कॉल आले. तसेच राजकारणात समय सुचकता आणि तडजोड या गोष्टी आहेत.'

हाकेंना पत्रकारांनी तुम्ही वरिष्ठ नेत्यांचे ऐकता का असा खोचक प्रश्न विचारल्यानंतर हाकेंनी ते तुम्हाला माहिती आहेच की असं म्हणत उत्तर देण टाळलं. गेल्या चार वर्षात तुम्हाला लक्ष्मण हाके काय आहे हे माहिती आहे.

१८ महामंडळांचा केला उल्लेख

हाके यांनी पत्रकार परिषदेत, याच सरकारने निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी १८ महामंडळे घोषित केली. मात्र त्या महामंडळांना अजूनही अध्यक्ष भेटलेला नाही. असं म्हणत सूचक वक्तव्य केलं. याचबरोबर त्यांनी अर्ध्यापेक्षा जास्त जनतेला अर्धा टक्के तरतूद झाली आहे. आम्हाला काही गोष्टी जाणवल्या म्हणून आम्ही काही गोष्टी आक्रमकपणे मांडत आहोत. या सगळ्या गोष्टी असल्या तरी वरिष्ठ मंडळींनी मला कॉल तर केलेच.

मात्र ज्यावेळी सुनेत्राताईंचा कॉल आला त्यावेळी मी ठरवलं की एवढी सगळी लोकं कॉल करत असतील तर आपण निर्णय घेतला पाहिजे असं हाके म्हणाले. हाकेंनी माघार घेताना मी माझ्या मागण्यांवर आणि भूमिकेवर आजही ठाम आहे असं सांगायला ते विसरले नाहीत.

जरी हाकेंनी माघार घेण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांचा सहकारी आणि आंदोलनकर्ते चंद्रकांत वाघमोडे उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT