Katraj new tunnel:
Pune: पुण्याकडून खेड शिवापूरच्या दिशेला जाणाऱ्या कात्रज नवीन बोगद्याच्या अलीकडे मोठी दरड कोसळली. यामुळे रस्त्याच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या दरडीमुळे जवळपास निम्मा रास्ता व्यापला आहे. मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसात ही दरड कोसळल्याची माहिती येथे आलेल्या कर्मचाऱ्यांनी दिली. सकाळपासून याठिकाणी ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.
गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्राला झोडपून काढले आहे.पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याला मंगळवारी पावसाने अक्षरशः झोपडून काढले. सर्वाधिक पाऊस पिंपरी चिंचवड भागात 101 मि.मी. तर जिल्ह्यातील लोणावळा, हवेली, गिरीवन, माळीण पुरंदर भागातही जोरदार पाऊस झाला. बुधवारीही जिल्ह्यात, विशेषत: ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम होता.
मंगळवारी जिल्ह्यात झालेला पाऊस:
चिंचवड 101 मि.मी
तळेगाव ढमढेरे 85.5 मि.मी
हडपसर 76 मि.मी
डुडुळगाव 70.5 मि.मी
वडगाशेरी 67 मि.मी
एनडीए 65.5 मि.मी
लोणावळा 56.5 मि.मी
पाषाण 54 मि.मी
हवेली 49 मि.मी
तळेगाव 44 मि.मी
गिरीवन 42 मि.मी
शिवाजीनगर 40.5 मि.मी
लवळे 35.5 मि.मी
राजगुरुनगर 29 मि.मी
माळीण 28 मि.मी
कोरेगाव पार्क 28 मि.मी
नारायणगाव 28 मि.मी
पुरंदर 17.5 मि.मी
निमगिरी 12.5 मि.मी
बालेवाडी 6 मि.मी
भोर 6 मि.मी
बारमती 5 मि.मी