Money Pudhari
पुणे

Kukadi Canal Repair: कुकडी डावा कालवा दुरुस्तीसाठी 47 कोटींचा निधी मंजूर

कालव्याची वहन क्षमता आणि सिंचन क्षमता वाढणार; सुमारे 6 हजार हेक्टर क्षेत्राला मिळणार लाभ

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र कृष्णा खोरेअंतर्गत असलेल्या कुकडी डावा कालव्याच्या (किलोमीटर 165-249) दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाने 47 कोटी 3 लाख 52 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या दुरुस्तीनंतर कालव्याची वहन क्षमता, सिंचन कार्यक्षमता वाढण्यासोबतच सहा हजार सिंचन क्षेत्राची पुनर्स्थापना होणार आहे.

कुकडी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज, डिंभे व पिपळगाव या पाच धरणांचा समावेश होतो. कुकडी प्रकल्पांतर्गत असलेला पाच उपयुक्त पाणीसाठा 864.64 दलघमी एवढा आहे. सिंचन क्षमता 1 लाख 55 हजार 56 हेक्टर असून, जून 2025 अखेर 1 लाख 44 हजार 647 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली. दरम्यान कुकडी डावा कालवा किलोमीटर 165 ते 249 मुख्य कालव्याचे मातीकाम, खोदकाम आणि बांधकामे 30 वर्षांपूर्वी झालेली आहेत.

तसेच किमी 189 ते 205 व किमी 206 ते 247 या अंतरामधील अस्तरीकरण 12 ते 15 वर्षांपूर्वी झालेले आहे. या कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात राडारोडा व झाडेझुडपे वाढलेली आहेत. तसेच पडझड झाली असून, गळती देखील वाढली आहे. त्यामुळे टेलपर्यंत (शेवटपर्यंत) पाणी पोहोचण्यासाठी खूप वेळ लागतो. ही बाब लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने या कालव्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालव्याच्या दुरुस्तीनंतर गळती थांबणार आहे. तसेच पाणी पूर्ण क्षमतेने वाहणार असल्याचे सिंचनक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT