पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव पार्क भागातील एका सदनिकेत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी छापा टाकून थायलंडमधील दोन तरुणींना ताब्यात घेतले. तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी थायलंडमधील एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस हवालदार रईसा बेग यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिच्याविरुद्ध अनैतिक मानवी देहव्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल केलेली महिला मूळची थायलंड येथील आहे. तिने कोरेगाव पार्कमधील एका सोसायटीत सदनिका भाडेतत्त्वावर घेतली होती. थायलंडमधील दोन तरुणींना स्पामध्ये काम देण्याच्या आमिषाने तिने भारतात आणले होते. कोरेगाव पार्कमधील सदनिकेत थायलंडमधील दोन तरुणी वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते, गुन्हे निरीक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सदनिकेत छापा टाकून दोन तरुणींना ताब्यात घेतले. तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणार्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा