पुणे: राज्यात कोकण आणि विदर्भात 3 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज असून, मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर पावसाचा जोर राहील. तर मराठवाड्यात मात्र कमी पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, शुक्रवारी मान्सूनने राजस्थानात मुसंडी मारत देशाचा 98 टक्के भाग व्यापला आहे. (Latest Pune News)
राज्यात 3 जुलैपर्यंत कमी-अधिक प्रमाणात विखुरलेल्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. कोकणात आगामी आठ दिवस अतिमुसळधार, विदर्भात मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात मध्यम पाऊस होईल, असा अंदाज आहे. तर मराठवाड्यात मात्र हलक्या पावसाचा अंदाज आहे.